सांगली : सांगलीतून अनोख्या पद्धतीचे आंदोलन समोर आले आहे. एसटी कर्मचारी पतीला रजा मिळत नसल्याने पत्नीने थेट सांगलीच्या आटपाडी येथील एसटी आगारामध्ये ठिय्या आंदोलन केले. आगार प्रमुखाच्या केबिन बाहेरच अंथरून टाकत झोपून आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाची आटपाडीमध्ये जोरदार चर्चा रंगली होती.
सुटीचा अर्ज नाकारला : विलास कदम हे गेल्या 33 वर्षांपासून एसटी सेवेत चालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या आटपाडी आगारमध्ये नेमणुकीस आहेत. 70 दिवसांनी ते निवृत्त होणार आहेत तर त्यांची 270 दिवसांची रजा शिल्लक आहे. कदम यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 व 13 मार्च रोजी सुट्टी मिळावी, असा अर्ज कदम यांनी आटपाडी एसटी आगार प्रमुखांना दिला होता. मात्र सुट्टीचा अर्ज नाकारल्याने विलास कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट एसटी प्रशासना विरोधात आंदोलन केले. थेट एसटी आगार प्रमुखांच्या केबिन समोर अंथरूण टाकत झोपून आंदोलन केले.
कार्यालयाबाहेर झोपून निषेध : आटपाडी आगारात चालक असलेले विलास कदम यांनी एसटीचे आगारप्रमुखांकडे सहा मार्च रोजी पत्नीला दवाखान्याला नेण्यासाठी १२ व १३ मार्च रोजी दोन दिवस रजा मागितली. परंतु एसटीचे अधिकारी की. एस. शिंदे यांनी एसटी (नं.६८) आटपाडी ते इचलकरंजी ही रजेच्या दिवशी पेत असल्याने सुट्टी देता येत नसल्याचे स्पष्ट केले. पत्नीला दवाखान्याच्या कारणानेही प्रशासनाने रजा न दिल्याने चालक आटपाडी पतीला रजा नाकारल्याने संतप्त पत्नीने आगार प्रमुखांच्या कार्यालयाबाहेर झोपून निषेध केला. विलास कदम हे रविवारी सकाळी आटपाडी आगारातून एसटी घेवून इचलकरंजीच्या ड्युटीसाठी गेले. त्यांच्यासोबत आगारात आलेल्या पत्नी मात्र आगारप्रमुख होनराव यांच्या बंद कार्यालयाबाहेर बिछाना टाकून झोपल्या. त्यांच्या अशारितीने झोपण्याचा प्रकार समजताच आगारात खळबळ माजली.