सांगली - मिरजेच्या गणेश तलावात आज सकाळी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी जागरूक नागरिकांमुळे महिलेचा जीव वाचला. सध्या या महिलेस उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिरजेतील तलावात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, नागरिकांनी वाचवले प्राण - गणेश तलाव
मिरज शहरातील गणेश तलावात आज सकाळी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी या महिलेचे प्राण वाचवले.

गणेश तलाव
गणेश तलाव
शहरातील गणेश तलावात आज सकाळच्या सुमारास या महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी महिलेला उडी मारताना आसपासच्या नागरिकांनी पाहिले आणि लगेचच तलावात उतरून तिला तलावाबाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या या महिलेला तातडीने मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.