सांगली - एका रुग्णालयामधून एक दिवसाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना तासगावमध्ये घडली आहे. एका महिलेकडून नर्स असल्याचे भासवून बॅगेत बाळाला घालून पलायन केल्याचा ( Stealing a newborn baby Tasgaon ) प्रकार घडला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे तासगाव शहरासह जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सिध्देश्वर चौकातील डॉ अंजली पाटील यांच्या रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली होती. या महिलने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र या बाळाचे रविवारी अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Newborn Baby Stealing Sangli : एक दिवसाच्या बाळाची रुग्णालयातून चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद - सांगली बाळ चोरी
एका महिलेकडून नर्स असल्याचे भासवून बॅगेत बाळाला घालून पलायन ( Stealing a newborn baby Tasgaon ) केल्याचा प्रकार घडला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे तासगाव शहरासह जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सिध्देश्वर चौकातील डॉ अंजली पाटील यांच्या रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली होती.
अशी घटली घटना :रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला रुग्णालयात आली. त्यानंतर या महिलेने प्रसुती झालेल्या महिलेच्या वार्डमध्ये प्रवेश करत, त्या ठिकाणी आपण नर्स असल्याचे भासवून बाळाला घेत, नजर चुकवून बाळाला एक दिवसाच्या बाळाला चक्क बागेत घालून रुग्णालयातून पालायन केले आहे. काही वेळानंतर बाळाच्या मातेने व नातेवाईकांनी बाळाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर बाळ गायब असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर तासगाव पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. दरम्यान सीसीटीव्ही तपासला असता महिलेने या बाळाचा अपहरण केल्याचा समोर आलेला आहे. सीसीटीव्हीत ही महिला रुग्णालयात येताना आणि त्यानंतर एका बॅगेत बाळ घालून घेऊन जात असल्याचे कैद झाले आहे. त्यानुसार तासगाव पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे तासगाव शहरासह सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -यवतमाळात बनावट हॉल तिकीट बनवणाऱ्या सायबर कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल