सांगली - जत शहरातील विठ्ठलनगर येथे रविवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या असता अचानक विजांच्या कडकडांसह पाऊस आल्याने हि घटना घडली.
शेळ्या चारत असताना वीज अंगावर पडून महिला ठार - जत तालुका
अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या असता अचानक विजांच्या कडकडांसह पाऊस आल्याने हि घटना घडली.
जत शहरात रविवारी दुपारी 3 च्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. तुळसाबाई डोंबाळे या राहत असलेल्या विठ्ठलनगर पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंत मळ्यात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी लिंबाच्या झाडाखाली तुळसाबाई उभ्या होत्या. याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, योगेश मोटे, नितीन साळे, पप्पू कांबळे, मेहबूब शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, शरद शिंदे, तलाठी रवींद्र घाडगे, कोतवाल सुभाष कोळी, पोलीस पाटील मदन माने-पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.