सांगली- जत तालुक्यातील रेवनाळ येथील एका विवाहितेने २ वर्षीय चिमुकल्या मुलाला पोटाला बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोनाली प्रकाश गणाचारी (वय 35) आणि मुलगा प्रज्वल अशी मृत माय-लेकराची नावे आहेत. आत्महत्येची ही घटना शुक्रवारी रात्री 8:30 च्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, सोनाली हिचे पती प्रकाश याच्यासोबत वारंवार किरकोळ भांडण होत असे. त्या भांडणाला कंटाळून सोनालीने आपल्या चिमुकल्याला पोटाला बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री उशीर झाला तरी, सोनाली आणि मुलगा प्रज्ज्वल हे दोघेही घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्या दोघांचा शोध सुरू केला. मात्र, त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याचवेळी परिसरातील विहिरीत वाकून पाहिले असता, पाण्यामध्ये चप्पल तरंगत असल्याचे दिसून आले. चपलांवरूनच सोनालीने विहिरीत उडी मारल्याची घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
जतमध्ये चिमुकल्यासह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - mother suicide with son
सोनाली हिचे पती प्रकाश याच्यासोबत वारंवार किरकोळ कारणावरून भांडण होत असे . त्या भांडणाला कंटाळून सोनालीने आपल्या चिमुकल्याला पोटाला बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री उशीर झाला तरी, सोनाली आणि मुलगा प्रज्ज्वल हे दोघेही घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्या दोघांचा शोध सुरू केला. मात्र, त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर तिने विहिरीत उडी मारल्याचे आढळले.

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.
Last Updated : Sep 12, 2020, 2:47 PM IST