महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टरांवरील ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्या; अन्यथा आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - मराठा क्रांती मोर्चा

इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह 5 जणांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. सांगली पोलिस विभागाला या बाबतचे निवेदन देत गुन्हे मागे घेण्यात आले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

atrocity-against-the-doctors-of-prakash-hospital
atrocity-against-the-doctors-of-prakash-hospital

By

Published : Jun 4, 2021, 7:47 PM IST

सांगली - इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह 5 जणांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. सांगली पोलिस विभागाला या बाबतचे निवेदन देत गुन्हे मागे घेण्यात आले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

"त्या' ॲट्रॉसिटीविरोधात मराठा क्रांती मोर्चा मैदानात -

इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या पाच डॉक्टरांविरोधात ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलनही सुरू आहे. आता या दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा पुढे आला आहे.

राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल -

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई व संजय पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्यासह 5 जणांच्यावर दाखल करण्यात आलेले ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या लोकांच्या कडून रुग्णाच्या नातेवाईकांना हाताशी धरून डॉक्टर व कर्मचार्‍यांविरोधात ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ राजकीय दबावापोटी कोणतीही चौकशी न करता हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे, तर हा सर्वप्रकार राज्यात कोरोनायोध्दा म्हणून काम करणाऱ्यांचा अपमान असून कायद्याचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तींच्या वर कारवाई करावी आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा नाईलाजाने मराठा क्रांती मोर्चाला प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details