महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घोटाळे बहाद्दरांसाठी पोलीस बंदोबस्त कशाला - राजू शेट्टी

देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर इथल्या शेतकऱ्यांना कृषी कायदे कसे चांगले आहेत हे सांगण्यासाठी आले आहेत. याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून कडकनाथ घोटाळ्यात बुडालेले पैसे वसूल करून द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यावर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी फडणीस व सदाभाऊ खोत यांना टोला लगावला आहे.

Raju Shetty on fadanvis and sadabau khot
राजू शेट्टी

By

Published : Dec 27, 2020, 7:21 PM IST

Updated : Dec 27, 2020, 7:34 PM IST

कोल्हापूर -कडकनाथ कोंबड्यांचा घोटाळा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात झाला. फडणवीस यांच्या आशीर्वादानेच या घोटाळ्याची चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही. कडकनाथ घोटाळा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कसे नसावे, याचे उत्तम उदाहरण आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर इथल्या शेतकऱ्यांना कृषी कायदे कसे चांगले आहेत हे सांगण्यासाठी आले आहेत. याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून कडकनाथ घोटाळ्यात बुडालेले पैसे वसूल करून द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र उलट शेतकऱ्यांचीच धरपकड केल्याने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.

स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी
इस्लामपूर शहरांमध्ये अतिरेकी शिरले आहेत का ? -एकीकडे शेतकरी आपले बुडालेले पैसे मागत आहेत तर दुसरीकडे घोटाळे बहाद्दरांसाठी इतका मोठा पोलीस बंदोबस्त कशासाठी, असा सवाल करत आमदार सदाभाऊ खोत यांना राजू शेट्टी यांनी टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सांगलीतील इस्लामपूर दौऱ्यावर आहेत. आत्मनिर्भर यात्रेच्या माध्यमातून थोड्याच वेळात ते येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांनी कडकनाथ घोटाळा फडणवीस यांच्या कार्यकाळात झाला असून फडणवीस यांच्या आशिर्वादामुळेच घोटाळ्याची चौकशी नीट झाली नाही म्हणत त्यांच्या आत्मनिर्भर यात्रेला विरोध केला आहे. शिवाय स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे या घोटाळे बहाद्दरांसाठी इतका मोठा पोलीस बंदोबस्त कशासाठी म्हणत इस्लामपूर शहरांमध्ये अतिरेकी शिरले आहेत का असा सवालही शेट्टींनी यावेळी उपस्थित केला आहे.
Last Updated : Dec 27, 2020, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details