सांगली- मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणार छळ..नकोशी म्हणून केला जाणार तिरस्कार..त्यातही भयंकर म्हणजे मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या.. अशा अनेक घटना आपण नेहमी वाचत, पाहत असतो. पण काळ बदलला आहे. आणि आता मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्याच्या सुखद घटनाही कानावर येत आहेत. अशीच एक घटना सांगलीच्या खाणभाग परिसरात राहणारे नितीन यादव यांना वर्षाच्या सुरुवातीलाच कन्यारत्न झाले. त्यांनी मोठ्या जल्लोषात चिमुकलीचे स्वागत करण्यात आले.
मुलगी झाली हो!..सांगलीत स्त्री जन्माचे अनोखे स्वागत - sangli girl birth news
यादव कुटुंबात हे एकमेव कन्यारत्न असल्यामुळे घरात जणू लक्ष्मीच जन्माला आली असल्याची भावना यादव कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. छोट्याशा परिचे घरात पाहिले पाऊल पडावे यासाठी जंगी तयारी यादव कुटुंबाने केली होती. केवळ घर नाही तर संपुर्ण गल्ली फुग्यांनी- फुलांनी सजवण्यात आली होती.
यादव कुटुंबात हे एकमेव कन्यारत्न असल्यामुळे घरात जणू लक्ष्मीच जन्माला आली असल्याची भावना यादव कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. छोट्याशा परिचे घरात पाहिले पाऊल पडावे यासाठी जंगी तयारी यादव कुटुंबाने केली होती. केवळ घर नाही तर संपुर्ण गल्ली फुग्यांनी- फुलांनी सजवण्यात आली होती. रस्त्यांवरही मोठी रांगोळी काढण्यात आली होती. आणि सजवलेल्या आलिशान गाडीत त्या छोट्याश्या राजकुमारीला घरी आणण्यात आलं. मग औक्षण आणि फटाक्यांची आतिषबाजी असे धुमधडाक्यात यादव कुटुंबाने आपल्या लाडलीचा घरप्रवेश केला. हा स्वागत सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.