सांगली -'आम्ही पुन्हा येणार' असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( jayant patil ) यांनी केला आहे. तसेच, कधी येणार याचा मुहूर्त पण थोड्या दिवसात सांगू. देशात आता निवडून आलेल्यांना गोळा करून त्यांची किंमत मोजायची आणि सत्तेची अशी फॅशन सुरू झाल्याची टीकाही पाटील यांनी भाजपवर नाव न घेता केली आहे. ते सांगली प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 'आमचं सरकार पुन्हा येईल' -सांगलीमध्ये आपत्ती मित्र समितीच्या अॅप्सचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. 'आम्ही पुन्हा येणार यात शंका नाही. पण कधी येणार याचा मुहूर्त थोड्या दिवसांत सांगू. मात्र, आमचं सरकार पुन्हा येईल, यात माझ्या मनात शंका नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.
'...तर ती राजकीय आत्महत्या' -आता कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीत भाग न घेता कोणाला निवडून यायचा ते निवडून येऊ द्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांना ताब्यात घेऊ आणि त्याची काही किंमत असेल ते मोजू, अशी नवी फॅशन देशात तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गावोगावी फिरा, प्रचार करा, लोकांना आपले मते समजवा, यापेक्षा सगळ्यांना निवडून येऊ द्यावं. त्यानंतर त्यांना गोळा करावं, हे देखील आता नवी स्टाईल राजकारणात पुढच्या दहा वर्षात निर्माण होईल. कारण निवडून आलेले एका अधिकृत पक्षातले मोठ्या प्रमाणात नेते दुसरीकडे जात असतील तर ती राजकीय आत्महत्या आहे. हे निवडणुकीच्या कायद्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे, असे मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा -Shivendra Raje Bhosale: पालिकेची निवडणूक आल्याने उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रराजेंचा टोला