महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर, वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ

गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवार सकाळी सात फुटांवर असणारी पातळी आता 23 फुटांवर पोहचली आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढल्याने पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील नागठाणे आणि सांगलीवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेला आहेत.मात्र रात्री नंतर वाढीचा वेग मंदावला आहे.

water-level-of-krushna-annd-varna-river-increasing-in-sangli
water-level-of-krushna-annd-varna-river-increasing-in-sangli

By

Published : Jun 18, 2021, 12:43 PM IST

सांगली - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटावर पोहचली आहे. तर वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने दोन्ही नद्यांवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पाणी पातळीत वाढ कायम असल्याने नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

24 तासात कृष्णाची पातळी 23 फुटांवर..

गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवार सकाळी सात फुटांवर असणारी पातळी आता 23 फुटांवर पोहचली आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढल्याने पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील नागठाणे आणि सांगलीवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेला आहेत.मात्र रात्री नंतर वाढीचा वेग मंदावला आहे.

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर..

वारणा नदीच्या पातळीतही वाढ..

दुसरीकडे शिराळा तालुक्यातही संततधार पाऊस सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने वारणा नदीवरील चिकूर्डे, कोकरूड,रेठरे बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ओढे-नाले, तलाव हे तुडुंब भरून वाहत आहेत.तर कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details