महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - कृष्णेच्या पाणी पातळीत होणार वाढ

मंगळवारी सकाळपासून पडणारा पाऊस लक्षात घेऊन विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज सकाळपासून ७३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग, यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

कृष्णेच्या पाणी पातळीत होणार वाढ

By

Published : Sep 4, 2019, 8:33 PM IST

सांगली- कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये येत्या दोन दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे. नदीची पाणी पातळी ३४ फुटांवर जाऊ शकते. त्याचबरोबर, पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग, यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

जिल्ह्यात कृष्णा नदीला महापूर येऊन अजून महिना संपला नसताना पुन्हा पाण्याची पातळी वाढू लागली आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, तर धरण जवळपास भरल्याने धरण प्रशासनाकडून कालपासून कृष्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळपासून पडणारा पाऊस लक्षात घेऊन विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज सकाळपासून ७३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. २४ तासांमध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे. सांगलीमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास १० फुटांवर पाण्याची पातळी असून, येत्या दोन दिवसात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्याने, पाण्याची पातळी वाढणार आहे. पाण्याची पातळी साधारणत: ३४ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली.

अनुचित परिस्थितीला तोंड देण्यास जिल्हा प्रशासन सज्ज

तसेच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. संबंधित सर्व विभागांना तसेच कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती चौधरी यांनी दिली आहे.

तर येत्या दोन दिवसात पाणी पातळी जरी वाढली तरी पाणी नदीपात्रातच राहील आणि इशारा पातळी गाठणार नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही माहिती हवी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, महापूर ओसरून अजून महिना झाला नसताना पुन्हा पाणी पातळी वाढणार असल्याने कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details