सांगली - येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मध्ये पुन्हा वाढ झाली असून सध्या या नदीची पाणीपातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. तर, शनिवारी पाण्याच्या पातळीमध्ये घट होऊन १ फुटाने पाण्याची पातळी कमी झाली होती. मात्र, आज पातळीमध्ये वाढ होऊन पाण्याची पातळी २ फुटाने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या सखल भागातील नागरिकांना स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कृष्णेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, सांगलीतील काही रहिवाशांना स्थलांतर करण्याच्या सूचना - flood affected area
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मध्ये पुन्हा वाढ झाली असून सध्या या नदीची पाणीपातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. पाणी पातळीतील वाढ लक्षात घेत महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या सखल भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गुरुवारपासूनच पाण्याची पातळी हळू-हळू वाढत होती, ती शुक्रवारी 29 फुटांपर्यंत पोहोचली. मात्र, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर पाण्याची पातळी १ फुटाने कमी झाली होती. शनिवारी सांगलीमध्ये 28 फुटांपर्यंत पाण्याची पातळी खाली गेली होती. मात्र, धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत शनिवारी रात्रीपासून पुन्हा वाढ होऊ लागली आहे. तर, रविवारी सायंकाळी पाण्याची पातळी 30 फुटांवर पोहोचली आहे.
कृष्णा नदीची वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, सांगली शहरातील सखल भाग असणाऱ्या काका नगर, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर तसेच मगरमच्छ कॉलनी येथील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.