सांगली -कोयना धरणातून 49 हजार 927 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शहरातील आयर्विन पूल येथील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून सोमवारी 10 फूट असणारी कृष्णा नदीची पाणीपातळी आज सकाळी 17 फुटांवर पोहोचली आहे.
'कृष्णे'च्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - sangli rain update in marathi
कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 30 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज पाटबंधारे प्रशासनाने वर्तवला आहे. तर सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून 7 हजार 987 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पाणीपातळी 30 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज
कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 30 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज पाटबंधारे प्रशासनाने वर्तवला आहे. तर सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून 7 हजार 987 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांची पाणीपातळी लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यात येत असून 71 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग खाली सुरू आहे.