महाराष्ट्र

maharashtra

सांगली महा'पूर'; लष्कराची दोन हेलिकॉप्टर दाखल, मदतकार्याला वेग

By

Published : Aug 9, 2019, 9:56 AM IST

Updated : Aug 9, 2019, 1:01 PM IST

सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या महापुराने हाहाकार उडाला आहे. गेल्या पाच दिवसांपासुन कृष्णेच्या पाणी पातळीत वेगाने होणारी वाढ आता थांबली आहे आहे. कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग आणि पावसाची जोर ओसरल्याने सांगलीमध्ये पाणी पातळी स्थिरावली आहे.

लष्कराची दोन हेलिकॉप्टर दाखल, मदतकार्याला वेग

सांगली- शहरात लष्कराची दोन हेलिकॉप्टर दाखल झाली असून हेलिकॉप्टरमधून पूरात अडकलेल्या नागरिकांना फूड पॅकेट दिले जाणार आहेत. कवलापूर विमानतळ जागेवर फूड पॅकेट तयार केले जात आहेत. हेलिकॉप्टरमधून हरिपूर, सांगलीवाडीलमध्ये फूड पॅकेट टाकण्यात येणार आहेत. पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन सांगलीत दाखल झाले आहेत.

सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या महापुराने हाहाकार उडाला असून बचावकार्य सुरू आहे.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुरू असलेली वाढ थांबली आहे. 56.5 फुटांवर पोहचलेली पाणी पातळी स्थिर झाली आहे. गेल्या 12 तासांपासून ही पातळी स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सांगली शहरात पाण्याचा फुगवटा वाढलेला आहे, तर महापुराच्या विळख्यात अद्यापही हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या महापुराने हाहाकार उडाला आहे. गेल्या पाच दिवसांपासुन कृष्णेच्या पाणी पातळीत वेगाने होणारी वाढ आता थांबली आहे आहे. कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग आणि पावसाची जोर ओसरल्याने सांगलीमध्ये पाणी पातळी स्थिरावली आहे. गुरुवारी सायंकाळी 57.5 फुटांवर पोहचलेल्या पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, सांगली शहारात पाण्याचा फुगवटा वाढत असून शहराच्या पश्चिमकडेच्या भागात पाणी सरकत आहे. त्यामुळे घरात पाणी शिरत आहे.

गुरुवारी सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 8 फुटांनी, इस्लामपूरच्या बहे येथील 3.6 फुटांनी ताकारी 2 फुटांनी कमी झाली आहे. मात्र, भिलवडी व सांगली येथील पाणी पातळी स्थिर आहे. सांगलीतील नदीची पाणी पातळी 12 तासांपासून स्थिर असून शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यत ही पातळी स्थिर होती.

कोयना धरणातून शुक्रवारी सकाळी 8 वाजता 69 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, धरण पाणलोट आणि सातारा जिल्ह्यातील पाऊसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सांगली शहरात होणारी वाढ थांबली आहे. तर हळूहळू वाढ कमी होईल असा अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : Aug 9, 2019, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details