सांगली - जलसंवर्धनाकडे संवेदनशील बाब म्हणून पाहिले पाहिजे, असे मत मिरजच्या नागरिकांनी व्यक्त केले आहे. प्रत्येकाने स्वत:पासून पाणीबचतीची सुरुवात करून जलसंवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
ईटीव्ही भारतच्या 'करूया संकल्प जलसंवर्धनाचा' उपक्रमांतर्गत मिरजेतील 'सर्वोदयचा महाराजा' या गणेश मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे.
जलसंवर्धनाकडे संवेदनशील बाब म्हणून पाहिले पाहिजे, असे मत मिरजच्या नागरिकांनी व्यक्त केले पावसाळ्यातही जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी तसेच मिरज तालुक्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजना अस्तित्वात आहेत. मात्र, या योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने गावांपर्यंत योजनेचे पाणी अद्याप पोहोचलेले नाही. दोन लाखांहून अधिक लोकांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.
अशा परिस्थितीत पाण्याची बचत कशी केली पाहिजे, याबाबत ईटीव्ही भारताच्या 'करूया संकल्प जलसंवर्धन' या मोहिमेअंतर्गत मिरजकर जनतेच्या मनात काय हे जाणून घेतले...
पाणी जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले. यामध्ये विनाकारण गाड्या धुणे, तसेच साठवून ठेवलेले पाणी फेकून देण्याबाबत विचार केला पाहिजे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करणेही गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.