महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी,अन्यथा उद्रेक होईल, मराठा क्रांती मोर्चाचा जनआक्रोशी इशारा - Mass agitation for reservation

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे, शासनाने घोषीत केल्याप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना 50% फी माफी मिळावी, सांगली जिल्ह्यातील मुला-मुलींचे वसतीगृह मागील 1 वर्षापासून बंद आहे, ते त्वरीत कायमस्वरूपी वसतीगृह निर्माण करावे. यासह विविध मागण्यांसाठी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

आरक्षण बाबत भूमिका जाहीर करावी
आरक्षण बाबत भूमिका जाहीर करावी

By

Published : Feb 2, 2021, 4:24 PM IST

सांगली - मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारने आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचा जनआक्रोशी इशारा
आरक्षणासाठी जनआक्रोशी आंदोलन
मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे, शासनाने घोषीत केल्याप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना 50% फी माफी मिळावी, सांगली जिल्ह्यातील मुला-मुलींचे वसतीगृह मागील 1 वर्षापासून बंद आहे, ते त्वरीत कायमस्वरूपी वसतीगृह निर्माण करावे. मराठा आरक्षण स्थागितीपूर्वी ज्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, अशा सर्व विभागातील मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात. याशिवाय स्थागितीपूर्वी सुरू झालेल्या व अंतिम टप्प्यात असलेल्या प्रक्रियांना संरक्षण द्यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करण्याची संधी कमी करण्यात आल्या असून सदर निर्णय मराठा समाजासह खुल्या प्रवर्गावर अन्याय करणारा असल्याने सदर निर्णय रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर सारथी संस्थेला आवश्यक असणारे सक्षम प्रकल्प अधिकारी व मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जनआक्रोशी आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलन करत मराठा क्रांती मोर्चातर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नेत्यांची उपस्थिती, मात्र भूमिककेवरून आंदोलकांची नाराजी
मराठा क्रांती मोर्चाच्या या जनआक्रोशी आंदोलनात सहभागी पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. मात्र आंदोलकांनी यावेळी सर्व नेत्यांनी पाठिंबा देणारी भूमिका जाहीर न केल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच राजकीय नेते हे केवळ फोटोसेशनसाठी हजेरी लावतात, अशी टीका केली. तर सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत भूमिका घ्यावी, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details