महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Local Body Elections 2021 : जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - R R Patil

राज्यभरात विविध नगर पंचायती व नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी ( Maharashtra Local Body Elections 2021 ) आज मतदान होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या ३ नगर पंचायतींसाठीही आज मतदान ( Sangli Local Body Elections 2021 ) होत असून, यामध्ये राज्याच्या राजकारणात धुरंधर समजल्या जाणाऱ्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदानाला सुरुवात
मतदानाला सुरुवात

By

Published : Dec 21, 2021, 9:44 AM IST

सांगली - जिल्ह्यातल्या 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात ( Sangli Local Body Elections 2021 ) झाली आहे. खानापुर कडेगाव आणि कवठे महांकाळ येथील नगर पंचायतीसाठी ( Nagar Panchayat Election 2021 ) मतदान होत आहे. प्रत्येकी 13 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. तर 40 मतदान केंद्रावर 23 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात, दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला

39 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव, खानापूर आणि कवठे महांकाळ येथील नगर पंचायत निवडणूकीसाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. आता मतदान पार पडत आहे. मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक मतदान केंद्रावर सकाळी सकाळी मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. प्रत्येकी 13 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेसाठी चोख नियोजन करण्यात आले असून, खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
कडेगाव नगरपंचायतमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि इतर स्थानिक आघाड्या अशी बहुरंगी लढत असून, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख ( Ex MLA Prithviraj Deshmukh ), संग्रमसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड ( MLA Arun Lad ) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खानापूर नगरपंचायतमध्ये ( Khanapur Nagar Panchayat ) सध्या काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता असून, याठिकाणी काँग्रेस, शिवसेना आघाडी विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादी व स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. याठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर ( MLA Anil Babar ) आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( MLA Gopichand Padalkar ) व स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष आघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. सध्या भाजपा खासदार संजयकाका पाटील ( MP Sanjaykaka Patil ) आणि माजी मंत्री अजीतराव घोरपडे ( Ex Minister Ajitrao Ghorpade ) यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय स्थानिक आघाडीची याठिकाणी सत्ता आहे. आता याठिकाणी स्वर्गीय आर.आर.पाटील ( R R Patil ) यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या विरोधात भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे माजी मंत्री अजितराव घोरपडे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटील याचा कट्टर समर्थक असणाऱ्या सगरे व कोठावळे गटाने एकत्र येत मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details