सांगली - जिल्ह्यातील जत या दुष्काळ भागात रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पूर्व भागात मतदानावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. उमदी येथील मतदान केंद्राबाहेर पाण्याचे तळ साचले आहे. त्यामुळे मतदान केंद्र ओस पडली आहेत.
सांगलीत मुसळधार पाऊस, उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप - सांगलीत मुसळधार पाऊस
पूर्व भागातील उमदी परिसरात पडलेल्या पावसामुळे भोर नदीला पूर आला आहे, तर या ठिकाणी असणाऱ्या मतदानाला याचा फटका बसत आहे. येथील एका मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
![सांगलीत मुसळधार पाऊस, उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4818109-thumbnail-3x2-sang.jpg)
उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप
सांगलीत मुसळधार पाऊस, उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप
पूर्व भागातील उमदी परिसरात पडलेल्या पावसामुळे भोर नदीला पूर आला आहे, तर या ठिकाणी असणाऱ्या मतदानाला याचा फटका बसत आहे. येथील एका मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शाळेच्यासमोर मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे याठिकाणी मतदारांना पोहोचण्यास अडचण येत आहे. यामुळे 9 वाजेपर्यंत येथील मतदान केंद्र ओस पडले होते.