सांगली - एका सुवर्ण कारागीराचे दुकान फोडत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सांगलीच्या विटा येथे घडली आहे. विट्याच्या सराफपेठेत हा धाडसी चोरीचा प्रकार घडला असून चोरटयांनी सीसीटीव्हीची मोडतोड केली.
विट्यातील सराफपेठेत धाडसी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास - vita
एका सुवर्ण कारागीराचे दुकान फोडत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सांगलीच्या विटा येथे घडली आहे. विट्याच्या सराफपेठेत हा धाडसी चोरीचा प्रकार घडला असून चोरटयांनी सीसीटीव्हीची मोडतोड केली.

विटा येथील मध्यवर्ती भागात असलेले कनक अपार्टमेंटमधील सुवर्ण कारागिराचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. सुनील पवार यांचे विटा येथे सुवर्ण अलंकार बनवण्याचे दुकान आहे. या दुकानात अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही तसेच शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस आणि उपविभागीय पोलीस उप-अधीक्षक अमरसिंह निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. नक्की किती मुद्देमाल लंपास झाला याबाबत पोलिसही साशंक आहेत. चोरट्यांनी दुकानातील सामान अस्ताव्यस्त करुन ठेवले आहे. दरम्यानशहराच्या मध्यवर्ती भागात चोरीची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.