महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकारणातील नवा पायंडा, नवदुर्गांच्या हस्ते नारळ फोडून विश्वजीत कदमांनी केला प्रचाराचा शुभारंभ - क्षेत्र औदुंबर विश्वजित कदम प्रचार सभा

काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी दिग्गज नेत्यांच्या हस्ते नारळ फोडण्याच्या परंपरेला फाटा देत दसऱ्याच्या निमित्ताने नवदुर्गांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. यानिमित्ताने राजकारणात प्रचाराचा नवा पायंडा या दसऱ्याच्या निमित्ताने निवडणूकीत सुरू करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पलूसच्या श्री क्षेत्र औदुंबरमध्ये नवदुर्गांच्या हस्ते नारळ फोडून विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेला सुरुवात

By

Published : Oct 9, 2019, 9:04 AM IST

सांगली - दसऱ्याच्या निमित्ताने नवदुर्गांच्या हस्ते नारळ फोडून काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी प्रचाराला सुरुवात केली. दिग्गज नेत्यांच्या हस्ते नारळ फोडण्याच्या परंपरेला फाटा देत नव्या पद्धतीने त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या निमित्ताने राजकारणात प्रचाराचा नवा पायंडा कदम यांनी सुरू केला असून पलूसच्या श्री क्षेत्र औदुंबरमध्ये हा प्रचार शुभारंभ झाला आहे.

पलूसच्या श्री क्षेत्र औदुंबरमध्ये नवदुर्गांच्या हस्ते नारळ फोडून विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेला सुरुवात

निवडणूकीचा प्रचाराचा शुभारंभ खरं तर दिग्गज राजकीय नेत्यांच्या हस्ते नारळ फोडून करण्याची परंपरा सगळीकडेच पाहायला मिळते. मात्र, सांगलीच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रचाराचा मंगळवारी वेगळ्या पद्धतीने शुभारंभ झाला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विश्वजीत कदम यांनी नवदुर्गा समजल्या जाणाऱ्या महिलांच्या हस्ते आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. भिलवडी येथील श्री क्षेत्र औदुंबर येथून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावरही यावेळी प्रामुख्याने महिलांना स्थान देण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या महिला प्रतिनिधींना भाषणाची संधी देण्यात आली होती. तर, प्रचार शुभारंभ सोहळ्यास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. तर राजकारणात प्रचाराचा नवा पायंडा या दसऱ्याच्या निमित्ताने निवडणूकीत सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details