महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारचे सकारात्मक निर्णय विरोधकांना बघवत नाहीत - मंत्री विश्वजित कदम - कर्जमाफी

कोरोनाबाबात राज्यात दक्षतेसाठी आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या आहेत. मात्र, सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे.

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

By

Published : Mar 8, 2020, 7:53 AM IST

Updated : Mar 8, 2020, 8:09 AM IST

सांगली- शेतकरी कर्जमाफीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी चांगलेच फटकारले आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांबाबत सकारत्मक निर्णय घेत असल्याने विरोधकांना हे बघवत नाही, म्हणून टीका टिप्पणी सुरू असल्याची टीका विश्वजित कदम यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

बोलताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

तसेच 2 लाखांच्या आतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासाच दिला. सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, त्यामुळे याबाबत फालतू चर्चा करू नये, असा टोलाही विश्वजित कदमांनी विरोधकांना लगावला.

तसेच शिवभोजन थाळी गोरगरीबांसाठीच असल्याचे सांगत विश्वजित कदम यांनी अजित पवारांच्या सुरात सूर मिसळला आहे. शिवभोजन थाळी योजनेमध्येही लवकरच बदल करणार असल्याचेही मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.

त्याच बरोबर राज्यात कोरोनाबाबत भीतीचे वातावरण नाही. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. पण, राज्यात दक्षतेबाबत आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या आहेत. मात्र, सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही कदम यांनी केले आहे.

हेही वाचा -शिराळा तालुक्यात अवैध दारूसाठ्यासह 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

Last Updated : Mar 8, 2020, 8:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details