महाराष्ट्र

maharashtra

सरकारला पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही - विश्वजीत कदम

सांगलीत आधी महापूर नंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात शेतीचे आणि द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बागांची आमदार कदम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

By

Published : Nov 4, 2019, 4:16 PM IST

Published : Nov 4, 2019, 4:16 PM IST

विश्वजीत कदम

सांगली- भाजप सरकारमध्ये कोणीही शेतकरी नाही, ही शोकांतिका आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही, अशी टीका काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार विश्वजीत कदम यांनी केली. सांगलीतील पलूस येथे नुकसानग्रस्त द्राक्षबागांच्या पाहणीवेळी ते बोलत होते.

सरकारला पिकांच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही

सांगलीत आधी महापूर नंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात शेतीचे आणि द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बागांची आमदार कदम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हे वाचलं का? - मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस

सांगली जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर 10 हजार कोटी रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे 35 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, सरकारला शेतीच्या नुकसानीबद्दल गांभीर्य नाही, असे विश्वजीत कदम म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details