सांगली -राज्यात यंदा उसाचे क्षेत्र जास्त आहे. यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये, म्हणून राज्यातील बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते विटा येथे माध्यमांशी बोलत होते.
राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, की गेल्या वर्षापासून आणि यावर्षीही उसाचे अधिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये झाले आहे .त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे 100 टक्के गाळप व्हायला पाहिजे. तसेच बंद असलेल्या साखर कारखान्यांमुळे ऊस शिल्लक राहू नये, यासाठी महाराष्ट्रामध्ये बंद पडलेले साखर कारखाने लवकरात लवकर सुरू कसे होतील, यावर बैठक घेण्यात आली आहे. यंदा बंद पडलेले साखर कारखाने विक्रमी आकड्यात सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हेही वाचा-आर्यनच्या आरोग्याबद्दल जेलमधील अधिकारी चिंतेत
ऊस गाळपाविना राहणार नाही-