सांगली - माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते काँग्रेस आघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत आहेत.
वसंतदादांचे नातू विशाल पाटील झाले 'स्वाभिमानी', सांगलीतून भरला उमेदवारी अर्ज - स्वाभिमानी शेतकरी संघटना
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
![वसंतदादांचे नातू विशाल पाटील झाले 'स्वाभिमानी', सांगलीतून भरला उमेदवारी अर्ज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2881018-thumbnail-3x2-ncp.jpg)
विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना आघाडीचे नेतेमंडळी
विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना आघाडीचे नेतेमंडळी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी जनता आपल्याला साथ देईल, असा विश्वास व्यक्त केला.
Last Updated : Apr 2, 2019, 11:57 PM IST