सांगली -जिल्ह्यातील मिरज तालुका, या तालुक्यातील शिंदेवाडी हे गाव अगदीच कर्नाटक सीमेवर आहे. शिंदेवाडी गावातील गावकऱ्यांनी आपल्या रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखेर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या शिंदेवाडी गावातील जनतेचा मतदानावर बहिष्कार हेही वाचा... 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?'
20 वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही आणि पाठपूरावा करून देखील रस्त्याचे काम झाले नाही, असे बोलत शिंदेवाडीतील ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हे गाव राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि भाजपचे आमदार असलेल्या सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातील आहे.
हेही वाचा... काँग्रेस-राष्ट्रवादी चोर तर भाजपा हा संघटित डाकू- प्रकाश आंबेडकर
मिरज तालुक्यातील शिंदेवाडी या गावातील रस्त्याची 20 वर्षांपासून दुरावस्था आहे. कर्नाटक सीमेवर हे गाव असून, येथील लोकसंख्या 650 इतकी आहे. पाऊस पडल्यानंतर याठिकाणी असणाऱ्या माने, कुवळे, पाटील, कदम, साळुंखे वस्ती या ठिकाणी जाणे रस्त्याअभावी मुश्किल बनते. रस्ता नसल्याने लहान मुलांना शाळेत जाताना, उपचारासाठी रूग्णांची ने आण करताना येथील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
हेही वाचा... मानवी साखळीद्वारे चिमुकल्यांनी केली मतदान जनजागृती
रस्त्याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. आपले गाव कर्नाटक सीमेवर असल्याने असे होत असल्याचे गावकऱ्यांना वाटत आहे. अखेरीस आपल्या न्याय मागणीसाठी शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी आता निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले आहे. याबाबत शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला तसे निवेदन देत, आधी रस्ता मग मतदान अशी जाहीर भूमिका घेतली आहे. राज्याचे सामजिक न्याय मंत्री व भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचा हा मतदारसंघ असून गेल्या 10 वर्षांपासून खाडे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.