सांगली - लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी मुक्या जनावरांच्या अन्न-पाण्याचे हाल होत आहेत. सध्या काही प्राणीमित्र बाहेर पडून प्राण्यांची भूक भागवत आहेत. मात्र सांगलीत एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. एका तहानलेल्या नागाला पाणी पाजतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. प्राणीमित्रांनी नागाला पाणी पाजत कडाक्याच्या उन्हात त्यांची तहान भागवली आहे.
VIDEO: तहानलेल्या नागाला पाजले पाणी... - lockdown affects cobras in sangli
लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी मुक्या जनावरांच्या अन्न-पाण्याचे हाल होत आहेत. सध्या काही प्राणीमित्र बाहेर पडून प्राण्यांची भूक भागवत आहेत. मात्र सांगलीत एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. एका तहानलेल्या नागाला पाणी पाजतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
VIDEO: तहानलेल्या नागाला पाजले पाणी...
देशभरातील रहदारी बंद असल्याने शहरे ओस पडली आहेत. यामुळे जंगलातले प्राणी शहरी भागात रस्त्यावर येत आहेत. तर ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी शिवारात वन्यजीव प्राणी अन्न पाण्यासाठी वावरताना दिसत आहेत. नागांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिराळा गावात पाण्याच्या शोधात बाहेर पडलेल्या एका नागाचं दर्शन झालं. भर उन्हात फिरणाऱ्या या नागाला तहान लागल्याचे ओळखून एका ग्रामस्थाने त्याला पाणी पाजले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.