महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुरळप पोलिसांच्या सतर्कतेमुळे १६ हजार रुपयांसह हरवलेली बॅग दोन तासात ताब्यात - कुरळप पोलीस

कुरळप पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोख रक्कम 16 हजार सहित हरवलेली बॅग दोन तासात ताब्यात घेण्यात आली. मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असलेल्या एकाची 1 लाख 50 हजार रुपयांची मेडिकल बिले तसेच रोख रक्कम 16 हजार रूपये अशी असलेली बॅग ऐतवडे खुर्द (ता.वाळवा) येथे हरवली होती.

vigilance of Kurlap police t
vigilance of Kurlap police t

By

Published : Jun 11, 2021, 12:07 PM IST

सांगली - कुरळप पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोख रक्कम 16 हजार सहित हरवलेली बॅग दोन तासात ताब्यात घेण्यात आली. मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह योगेश राजेंद्र शितोळे (रा.विद्याविहार कॉलनी, विश्रामबाग सांगली) हे गुरुवारी चिकुर्डे येथील अमृता मेडिकलला औषध विक्री संदर्भात भेट देवून सांगलीकडे जात होते. त्यावेळी ऐतवडे खुर्द (ता.वाळवा) येथील शिवसदन बेकरी येथे अल्पोपहार घेताना त्यांची 1 लाख 50 हजार रुपयांची मेडिकल बिले तसेच रोख रक्कम 16 हजार रूपये अशी असलेली बॅग शिवसदन बेकरीजवळ हरवली असल्याचे त्याच्या लक्षात आले.

हरवलेल्या बॅगबाबत यातील मेडिकल रिप्रेझेंटेव्हि योगेश शितोळे यांनी ऐतवडे खुर्द गांवामध्ये तसेच रोडवरती शोधाशोध केली परंतु नक्की कोठे राहिली याबाबत आठवत नसल्याने त्यांनी सायंकाळी साडेचार वाजता कुरळप पोलीस ठाणेत येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना भेटुन त्यांची बँग हरवले बाबत माहिती सांगितली. सपोनि जाधव यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस ठाणेकडील सहाय्यक उप निरीक्षक कुलकर्णी, पो.को. सचिन मोरे, पो.को.चौगुले यांना बोलावून योगेश राजेंद्र शितोळे यांचेसोबत त्यांची बॅग शोधणे कामी तात्काळ ऐतवडे खुर्द पाठवले. मोरे व कुलकर्णी यांनी सपोनि दीपक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हरवले बॅगेचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला गावातील प्रत्येक दुकान व व्यक्तीकडे बॅग संदर्भात विचारणा केली मात्र सर्वजण माहिती नसलेचे सांगत असताना योगेश राजेंद्र शितोळे यांचा जीव कासावीस झाला होता. अखेर ऐतवडे खुर्द-चिकुर्डे गावचे रोडलगत ओघळीत सायंकाळी सव्वा पाच वाजता हरवलेली बॅग मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेवुन योगेश शितोळे यांना दाखवली. त्यांनी सदरची बॅग पाहून शितोळे यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुलले व बॅग उघडुन त्यामधील मेडिकल बिले व १६ हजार रोख रक्कम याची पाहणी केली असता बॅगमध्ये सर्व वस्तु मिळुन आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details