सांगली - सध्या कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीची आणि इतर गोष्टींची काळजी लागून राहते. १४ दिवस रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नाही व त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वाजित कदम यांनी दिली आहे. आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
आता कोरोना रुग्णालयात सुरू होणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा - विश्वजित कदम - video conferencing in corona hospital
मिरजेच्या कोरोना रुग्णालयात सध्या १२५ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी आणि नातेवाईकांना रुग्णांशी संवाद साधता यावा आणि एकमेकांची विचारपूस करून त्यांना काळजी वाटू नये, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात लवकरच ही सुविधा सुरू होईल, असा विश्वासही विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मिरजेच्या कोरोना रुग्णालयात सध्या १२५ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी आणि नातेवाईकांना रुग्णांशी संवाद साधता यावा आणि एकमेकांची विचारपूस करून त्यांना काळजी वाटू नये, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात लवकरच ही सुविधा सुरू होईल, असा विश्वासही विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संपर्क साधता येणार आहे.