इस्लामपूर(सांगली)- संपूर्ण जगभरात आज (26 सप्टेंबर) जागतिक कन्या दिन साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इस्लापूरमधील एका बुरूड समाजातील कन्येने सागरावर स्वार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती राहणाऱ्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन उत्तुंग भरारी घेतली. शिक्षणासाठी मुलगी आणि तिच्या कुटुबीयांनी भाजीपाला विक्री करणे, कपडे इस्त्री करण्याच्या कामाबरोबर वेळ प्रसंगी या मुलीच्या आईने मुलीच्या शिक्षणासाठी धुणीभांडी करण्याचेही काम केले आहे. या संगळ्यांच्या कष्टाचे चीज करत त्या मुलीने आज हाँगकाँगमधील एका कंपनीत नेव्हल ऑफिसर म्हणून सेवेत रुजू होत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. राधिका सूर्यवंशी असे तिचे नाव आहे. आज कन्या दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतचा राधिका सूर्यवंशीच्या थक्क करणाऱ्या शैक्षणिक प्रवासावरचा हा विशेष वृत्तात..
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे राधिका एका गरीब व मूकबधिर बापाच्या व अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलेली मुलगी म्हणजे राधिका सूर्यवंशी होय. लहानपणासापासूनच हुशार व जिद्दी होती. आई बाप जरी अशिक्षित असले तरी त्यांची राधिकाला शिकवण्याची आणि राधिकाची शिकण्याची जिद्द मात्र अफाट होती. याच जिद्दीच्या जोरावर आईने राधिकाला सुरुवातीला चौथीपर्यंत शिकवले. राधिका शाळेत हुशार असल्याने पुढे तिची पलूस येथील नवोदय शिक्षण संस्थेत तिची पुढील शिक्षणासाठी निवडही झाली.
आईला जावे लागले तुरुगांत-
राधिकाने आपल्या हुशारीच्या जोरावर नवोदयमध्ये प्रवेश मिळवला. मात्र तिथे तिला निवासी पद्धतीने वसतिगृहात राहुन शिक्षण घ्यावे लागणार होते. मात्र मूकबधिर असलेलेले राधिकाचे वडिल यांचा आणि त्यांच्या आईचा काही तर गैरसमज झाला. राधिकाच्या शिक्षणासाठी धडपडणारी आई तिला कुठेतरी हॉस्टेलला दूर पाठवत असल्याचा गैरसमजातून त्यांनी राधिकाच्या आईची पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे राधिकाच्या आईला थेट पोलीस कोठडीत जावे लागले. मात्र मंत्री जयंत पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी राधिकाच्या आईला सन्मानाने बाहेर काढून तिचा सत्कार केला आणि राधिकला शिक्षणासाठी पलूस येथे पाठवले.
नवोदयमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राधिकाच्या शिकवणीसाठी लागणारी फी देण्यासाठी तिच्या आईकडे अवघे 2000 रु सुद्धा नव्हते. मात्र मुलीच्या शिक्षणासाठी राधाच्या आईने शिकवणी घेणाऱ्या सरांच्या घरीच धुणी भांडी करण्याची तयारी दर्शवली. शिक्षणासाठी आई आणि मुलीचा हुरूप पाहून शिकवणी घेणारे शिक्षक मोहन पाटील यांनीही हसत हसत राधाला शिकवणीसाठी प्रवेश दिला. यावेळी नवोदय मध्ये ग्रामीण भागातील सुमारे पाच हजार विध्यार्थी शिक्षण घेत होते. यामधून 80विद्यार्थ्यांची निवड होणार होती. या इंशी मध्ये जिगरबाज राधिकाने नवोदय मध्ये निवड करून दाखवली.
पुढील शिक्षणासाठी 6 लाखांचा डोंगर, बुरूड समाज धावला