महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठिणगी पडून अचानक लागली गाडीला आग; भाजी विक्रेत्याचा होरपळून मृत्यू

अचानक शॉट-सर्किटमुळे ठिणग्या पडून गाडीला आग लागली. आगीने अचानकपणे भीषण स्वरूप घेतले, त्यामुळे ताटे हे गाडीतच अडकले आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही.

भाजी विक्रेता
भाजी विक्रेता

By

Published : Jun 8, 2021, 1:37 PM IST

Updated : Jun 8, 2021, 2:05 PM IST

सांगली- चारचाकीत वाहनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये एका भाजीपाला विक्रेत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. विटा या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. रघुनाथ पाटील, असे या दुर्दैवी भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे.

ठिणगी पडून अचानक लागली गाडीला आग
गाडीत होरपळून भाजी विक्रेत्याचा मृत्यूविट्यातील विवेकानंद नगर येथील निलसागर हॉटेलच्या मागे रघुनाथ रामचंद्र ताटे हे राहतात.भाजीविक्रेते असणारे रघुनाथ ताटे सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्या चारचाकी गाडीतून भाजीपाला आणि किराणामालाची विक्रीचा व्यवसाय करत होते.नेहमीप्रमाणे ताटे भाजीपाला विक्री करण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आपल्या चार चाकीमध्ये बसून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, असता अचानक शॉट-सर्किटमुळे ठिणग्या पडून गाडीला आग लागली. आगीने अचानकपणे भीषण स्वरूप घेतले, त्यामुळे ताटे हे गाडीतच अडकले आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही. आरडाओरडा सुरू झाल्यानंतर ताटे यांच्या घरात असणाऱ्या मुलाने धाव घेऊन आग विझण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगा इतकी भीषण होती, की या घटनेत रघुनाथ ताटे यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
Last Updated : Jun 8, 2021, 2:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details