सांगली- प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदार संघातला विद्यमान उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या ठिकाणी जयसिंग शेंडगे यांच्या जागी जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीतील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून याबाबतची शनिवारी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला ! प्रकाश शेंडगेंना उमेदवारी ? - वंचित बहुजन आघाडी
मतदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीतील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून याबाबतची शनिवारी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
![वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला ! प्रकाश शेंडगेंना उमेदवारी ?](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2847030-992-036010b1-117f-4689-a2e4-6abc9ff98017.jpg)
सांगलीतून भाजपचा उमेदवार निश्चित झाला आहे. मात्र विरोधात कोण लढणार याबद्दल स्पष्टता नाही. आधी सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानीला हा तिढा होता, अखेर स्वाभिमानीच्या वाट्याला जागा गेली आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांची उमेदवारांच्या बाबतीतली चाचपणी सुरू आहे. भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर, पाटील घराण्यातील विशाल पाटील की अन्य कोण ? यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खल सुरू आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र सांगली लोकसभेच्या निवडणुकीतील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकाश शेंडगे हे जयसिंग शेंडगे यांचे चुलत बंधू आहेत. धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातून प्रकाश शेंडगे यांचे असणारे काम, यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर प्रकाश शेंडगे यांनी धनगर समाजाला राज्याच्या एकाही पक्षाने या निवडणुकीमध्ये संधी दिली नाही. वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला संधी मिळाल्यास या सरकारच्या विरोधात आपण लढण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.