सांगली -सांगलीमध्ये आता एसटी (ST Strike) सुरू झाली आहे. एसटी प्रशासनाकडून शहरी बस वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. काही एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे एसटीकडून बस सेवा सुरू करण्यात येत आहे. मिरज आणि सांगली आगारातून शहरी बस सेवा आता सुरू करण्यात आली आहे.
कामावर परतू लागले कर्मचारी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू आहे. सांगलीमध्येही गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद करत आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे सर्व एसटी सेवा ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत, बस स्थानकातून खासगी वाहनांतून थेट प्रवासी वाहतूक सुरू केली होती. तर दोन दिवसांपासून शिवशाही बस (Shivshahi bus) सेवा सुरू झाली होती. आता लालपरीदेखील बस स्थानकातून धावू लागली आहे.
पोलीस बंदोबस्त
संप अद्याप मिटला नसली तरी काही कर्मचारी कामावर परतत आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने सांगली आणि मिरज आगारातून शहरी बस वाहतूक सुरू केली आहे. पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू झाली आहे.