महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Brutally Beaten चोर समजून उत्तर प्रदेशाच्या साधूंना बेदम मारहाण केल्याचा, धक्कादायक प्रकार - उमदी पोलिस

Brutally Beaten उत्तर प्रदेश मधल्या Uttar Pradesh चौघा साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण Sadhu marahan करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली आहे. कर्नाटक मधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना, चौघा साधूंना मारहाण करण्यात brutally beaten आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Brutal Beating
Brutal Beating

By

Published : Sep 13, 2022, 10:30 PM IST

Updated : Sep 16, 2022, 3:27 PM IST

सांगलीउत्तर प्रदेश मधल्या Uttar Pradesh चौघा साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण Sadhu marahan करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली आहे. कर्नाटक मधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना, चौघा साधूंना मारहाण करण्यात brutally beaten आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

साधू आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावाद उमदी पोलिसांच्याकडून मिळालेली माहितीप्रमाणे, उत्तर प्रदेश मधल्या मथुरा येथील चार साधू हे देवदर्शनाच्या निमित्ताने कर्नाटकच्या विजापूर ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर तेथून ते पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूरकडे जात असताना हे साधू लवंगा गावात पोहोचले होते. यावेळी या साधूंच्याकडून एका शाळकरी मुलाला रस्त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या काही ग्रामस्थांना साधूंच्या बद्दल संशय आला. त्यानंतर ग्रामस्थांनी साधूंच्याकडे चौकशी सुरू केली असता. साधू आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला.

उमदी पोलिसांची घटनास्थळी धावज्यामध्ये ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यानंतर ग्रामस्थांनी चौघा साधूंना गाडीतून बाहेर ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या साधूंना बाहेर ओढून ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. सदर घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघा साधून पोलीस ठाण्यामध्ये Umdi Police आणून त्यांची सखोल चौकशी सुरू केली. यामध्ये त्यांच्याकडे आधार कार्ड मिळून आले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक माहिती विचारली असता, त्यांच्या नातेवाईकांची मोबाईल क्रमांक त्यांच्याकडून मिळाले. त्यानंतर या चौघा साधूंची उत्तर प्रदेश मधल्या मथुरा या ठिकाणी चौकशी केली असता, ते मथुरा येथीलच खरे साधू असल्याचा समोर आले आहे. हे सर्व श्री पंचनाम जुना आखाडा येथील साधू असल्याचं स्पष्ट झाले, त्यामुळे ही मुले चोरी करणारी टोळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार मात्र या मारहाणीबाबत उत्तर प्रदेशच्या साधूंनी कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचं पोलिसांना सांगितलं आणि तसा जबाब देखील दिला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तक्रार दोन्ही बाजूने देखील दाखल झाली नाही. केवळ गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार घडल्याचं साधू आणि ग्रामस्थांनी सांगितले आहे. अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दिली आहे.

पालघरची पुनरावृत्ती टळलीकाही वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यामध्ये साधूंना चोर समजून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या मारहाणीनंतर साधूंचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे पालघर येथील साधू हत्याकांडांच्या प्रकरणांनी देशभर गाजलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती जत तालुक्यातल्या लवंगा येथे होता-होता सुदैवाने टळली आहे.

Last Updated : Sep 16, 2022, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details