सांगली -दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून सांगलीच्या वाळवा येथील एकास उत्तर प्रदेशच्या 'दहशतवादी प्रतिबंधक पथका'ने ताब्यात घेतले आहे. अर्जुन खराडे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे वाळवा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सांगलीच्या वाळवा येथील अर्जुन खराडे या तरुणाला उत्तर प्रदेशच्या एटीएसच्या पथकाने गुप्तपणे कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अर्जुन याचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याने त्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय उत्तर प्रदेश एटीएस पथकाला आला. त्यावरून ३ दिवसांपूर्वी 'दहशतवादी प्रतिबंधक पथकाने' वाळव्यात येवून अर्जुनला अटक केली. सध्या अर्जुन हा लखनऊ पोलिसांच्या कोठडीत असल्याची माहिती समोर आली आहे.