अमरावती - शेतकऱ्याच्या शेतमालाला एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे निसर्ग देखील बळीराजावर कोपला आहे. आज दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार व नांदगाव खंडेश्वर परिसरातील मंगरूळ चव्हाळा गावात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
अमरावती जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर परिसरात शेतीचे नुकसान - amravati rain
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीस आलेला हरभरा आणि उभ्या गहू पिकाला याचा फटका बसत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाने आज विदर्भात पावसाने हजेरी लावली.

अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीस आलेला हरभरा आणि उभ्या गहू पिकाला याचा फटका बसत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाने आज विदर्भात पावसाने हजेरी लावली. असाच अवकाळी पाऊस सुरू राहिल्यास रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.
हेही वाचा -सांगलीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; द्राक्ष बागांना फटका