सांगली - मंगळवारी सांगली शहरासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगलीमध्ये आज (मंगळवार) दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने सांगली शहराला अक्षरशः झोडपून काढले. अचानकच आलेल्या या पावसाने सागंलीकरांची मोठी तारांबळ उडाली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. मात्र, या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.