सांगली - अवकाळी पावसाने आज सांगली जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस बरसला. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाल्याने संपूर्ण जिल्हा गारेगार बनला.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. सांगलीसह जिल्ह्यात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर काही वेळातच काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजोरी लावली.