इस्लामपूर (सांगली) - व्यवसायिकाच्या दोन क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्यांच्या बँक खात्यावरील ३ लाख ६० हजारांची अज्ञाताने ऑनलाइन खेरदी करून फसवणूक केल्याची घटना इस्लामपूर येथील शिक्षक कॉलनी परिसरात घडल्याचे आज (दि. २२ नोव्हेंबर) उघड झाले आहे.
दोन 'क्रेडिट कार्ड'ची माहिती चोरून इस्लामपूर येथील व्यवसायिकाला ३ लाख ६० हजारांना गंडवले - इस्लामपूर गुन्हे बातमी
इस्लामपूर येथील एका व्यवयासिकाच्या दोन क्रेडिट कार्डची माहिती चोरून अज्ञाताना ३ लाख ६० हजारांचा ऑनलाइन चूना लावला आहे.
सुरेश रामचंद्र जाधव (वय ५० वर्षे), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून आज इस्लामपूर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार मंगळवार (दि. १० नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास घडला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सुरेश जाधव यांचा फुटवेअरचा व्यवसाय आहे. त्यांची अॅक्सिस व एचडीएफसी बँकेची दोन क्रेडिट कार्ड आहेत. अॅक्सिस बँकेच्या कार्डवरून सलग ३२ वेळा १० हजार रूपये प्रमाणे ३ लाख २० हजार तर एचडीएफसीच्या कार्डवरून सलग दोन वेळा ४० हजार रूपये डिबेट झाल्याचा संदेश जाधव यांना मोबाईलवर आला. जाधव यांनी हे क्रेडीट कार्ड कोणालाही वापरण्यास दिले नाहीत. तसेच कोणताही व्यवहार केला नाही. तरी हा व्यवहार झाल्याने त्यांनी कस्टमअर केअरला तक्रार दिली. त्यानंतरही पैसे काढले गेल्याने जाधव यानी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.