सांगली -लॉकडाऊनचे काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्यात आली आहे. जमिनीवर लोटांगणपासून हातावर चालणे, एकमेकाला ओढत घेऊन जाण्याची शिक्षा करण्यात आली. महापालिकेने स्थापन केलेल्या स्पेशल टास्क फोर्सकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. कुपवाड येथे ही कारवाई करण्यात आली.
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात नियमांचे पालन करण्यासाठी पालिका प्रशासनाने माजी सैनिकांची स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली आहे. या फोर्सकडून शहरात नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या फोर्सने फिजिकल डिस्टन्सिंचे नियम न पाळता कुपवाड भागात काही तरुणांना दिली.