महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ramdas Athavale : शिवसेना-भाजपा एकत्र येतील आणि सत्तेतही येतील - मंत्री रामदास आठवले - New Govt in Maharashtra in March

केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Union Social Justice Minister Ramdas Athavale ) यांनी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Union Social Justice Minister Ramdas Athavale
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

By

Published : Nov 27, 2021, 1:25 PM IST

Updated : Nov 27, 2021, 3:21 PM IST

सांगली -महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपासोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Union Social Justice Minister Ramdas Athavale ) यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत आठवले यांनी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. तसेच 'गो कोरोना'नंतर आठवले यांनी 'नो कोरोना' चा नारा दिला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.

आठवलेंचा आता "नो कोरोना" नारा -

सांगलीमध्ये आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आतापर्यंत घेण्यात आली आहे, भविष्यातही घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करत मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी "नो कोरोनाचा" नवा नारा दिला आहे. तसेच सोमवार पासून संसदीय अधिवेशन पार पडणार आहे, या अधिवेशनामध्ये विरोधकांनी गोंधळ घालू नये, असे आवाहन केले आहे.

तर राकेश टिकेतांवर कारवाई करा -

तसेच शेतकऱ्यांची मागणी असणारे कृषी कायदा केंद्र सरकारने मागे घेतले आहेत. त्यामुळे आता आंदोलन थांबले पाहिजे. आंदोलन सुरूच राहणार असले अन्यथा शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे.

शिवसेना-भाजपा सत्तेत येईल !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची सत्ता मार्च महिन्यात जाणार असल्याचे विधानाला दुजोरा देत, शिवसेना आणि भाजपा या आधी एकत्र होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून लवकर शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपा सोबत येऊन राज्यात नवी सत्ता येऊ शकते आणि ते मार्च-एप्रिलमध्ये येऊ शकते, त्यामुळे नारायण राणे यांचे जे विधान आहे, ते बरोबर असू शकते, असे मत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -गो एअरच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, प्रवासी सुखरूप

Last Updated : Nov 27, 2021, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details