सांगली - दिल्लीतील काही लोक सहकार संपवायला निघाले आहेत. तसेच सध्याच्या प्रचलित कायद्यामुळे सहकार क्षेत्राचे अस्तित्वात संपायला लागले आहे, अशी भीती व्यक्त करत केंद्र सरकारच्या सहकारी धोरणांवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. सहकारी व छोट्या मोठ्या बँका विलिनीकरणाचे फतवे निघत असून भविष्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंक विलिनकरणाचे ही फतवे निघतील, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री जयंत पाटील देशातील सगळे विकले जातंय -
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्लामपूर येथील विभागीय नुतन इमारतीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षासह संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री पाटील जमीन केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. अलीकडच्या काळात बँकिंग क्षेत्रात फार बदल झाले आहेत. आतापर्यंत सहकारी बँकांचे नियंत्रण नाबार्डकडे होते. मात्र, रिझर्व्ह बँकेने आता स्वतःकडे ठेवला आहे. त्यामुळे अर्बन बँकांना प्रत्येक गोष्टीसाठी रिझर्व्ह बँकेवर अवलंबून राहावे लागत आहे.
हेही वाचा -मोदी सरकामध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे-असदुद्दीन ओवैसी
केंद्रातील काही लोकांच्याकडून सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या सहकारी बँकांऐवजी भांडवलदारांच्या चार-पाच बँकाच राहिल्या पाहिजेत, असे धोरण आहे. त्यामुळे सद्धस्थितीत देशातील विमानसेवा, रेल्वेसेवा अशा गोष्टी विकल्या जात आहेत. तसेच अर्बन बँक असतील किंवा छोट्या-मोठ्या बँका असतील त्या विलीनीकरण करण्याचे फतवे निघत आहेत. भविष्यात जिल्हा मध्यवर्ती बँका देखील विलिनीकरणाचे फतवे निघतील, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.