महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन चुलत्याची आत्महत्या; सांगलीमधील घटना - Sangli Uncle attacks on Nephew

चुलते भाऊसो शंकऱ्याप्पा कोकरे (वय 55) हे मेंढरे राखण्याचा व्यवसाय करत. तर पुतण्या भागाप्पा तायाप्पा कोकरे (वय 40) हे ऊसतोड मजूर आहेत. सध्या ते कर्नाटकातील एका कारखान्यात ऊसतोडीस होते. शनिवारी ते आपल्या गावी भिवर्गी येथे आले असता, भाऊसो यांच्याबरोबर त्यांचा घरगुती वाद झाला. त्यानंतर रविवारीही सकाळी यातून वादावादी झाली होती.

Uncle attacked on Nephew with axe then committed suicide in Sangli's Jat
पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन चुलत्याची आत्महत्या; सांगलीमधील घटना

By

Published : Dec 29, 2020, 12:14 AM IST

जत (सांगली) : तालुक्यातीला भिवर्गी येथे घरगुती कारणावरून झालेल्या चुलता-पुतण्याच्या वादात चुलत्याने पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन, गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर जखमी झालेल्या पुतण्यावर मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

घरगुती वादातून झाला प्रकार..

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिवर्गी येथील कोकरेवाडी वस्ती येथे घटनेतील मृत चुलते भाऊसो शंकऱ्याप्पा कोकरे (वय 55) हे मेंढरे राखण्याचा व्यवसाय करत. तर पुतण्या भागाप्पा तायाप्पा कोकरे (वय 40) हे ऊसतोड मजूर आहेत. सध्या ते कर्नाटकातील एका कारखान्यात ऊसतोडीस होते. शनिवारी ते आपल्या गावी भिवर्गी येथे आले असता, भाऊसो यांच्याबरोबर त्यांचा घरगुती वाद झाला. त्यानंतर रविवारीही सकाळी यातून वादावादी झाली होती.

रविवारी दुपारी केला अचानक हल्ला..

त्यानंतर दुपारच्या सुमारास भागाप्पा हे भिवर्गी गावात ग्रामपंचायती समोर बसले होते. यावेळी भाऊसो हेही गावात आले होते. नेहमीप्रमाणे त्यांच्यासोबत कुऱ्हाड होती. भागाप्पा यांना पाहताच, भाऊसो यांनी हातातील कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला केला. यात भागाप्पा पुतण्या गंभीर जखमी झाले. रक्ताबंबळ पुतण्याला बघून केलेल्या कृत्याच्या भितीने चुलते भाऊसो कोकरे हे घरी न जाता थेट शेतात गेले. तेथे एका झाडाला दोरीने गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, जखमी पुतण्याला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. उमदी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत अधिक तपास दत्तात्रय कोळेकर करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details