महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक..! दारू पाजून अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने केला बलात्कार - चुलत्यानेच केला अल्पवयीन पुतणीवर बलात्कार बातमी

एक चुलत्याने अल्पवयीन पुतणीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार तासगाव तुलक्यातील कवेठएकंदमध्ये घडला आहे.

तासगाव पोलीस ठाणे
तासगाव पोलीस ठाणे

By

Published : Jan 30, 2021, 10:08 PM IST

सांगली- एका चुलत्याने तिच्या अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीला दारू पाजून हा बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात नराधम चुलत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दारू पाजून पुतणीवर बलात्कार

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद याठिकाणी राहणाऱ्या नराधमाच्या घरी त्याच्या नात्यातील एक अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी राहण्यासाठी आली होती. दरम्यान, 29 जानेवारीला रोजी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन व नात्याने पुतणी असणाऱ्या मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच यापूर्वीही दोन वेळा नराधमाने बलात्कार केल्याचा समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा निर्भया पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा अमरसिंग देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नराधमाविरोधात तासगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा -महामेळाव्यानंतर ओबीसी मोर्चे पाहा, प्रकाश शेंडगेंचा गर्भित इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details