महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंचा पीक विमा विरोधातील मोर्चा होणार नाही; सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा विश्वास - पिक विमा विरोधातील

राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर पिक विमा बाबतीत अन्याय होणार नाही. जे शेतकरी नुकसानभरपाईस पात्र आहे, त्यांना ती दिली जाईल तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे पिक विमा बाबत कोणतेही आंदोलन करणार नसल्याचा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा विश्वास

By

Published : Jul 13, 2019, 5:13 PM IST

सांगली - उद्धव ठाकरेंचा पीक विमा विरोधातील मोर्चा होणार नाही, असा ठाम विश्वास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंचा पिक विमा विरोधातील मोर्चा होणार नाही

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 17 जुलैला पीक विमा विरोधात इशारा मोर्चा होणार आहे. यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख सांगली येथे बोलताना म्हणाले, की राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर पीक विमा बाबतीत अन्याय होणार नाही. जे शेतकरी नुकसानभरपाईस पात्र आहे, त्यांना ती दिली जाईल तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे पीक विमा बाबत कोणतेही आंदोलन करणार नसल्याचा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details