महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री, सांगलीत राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष - शिवसेना नेते उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा करण्यात आला.

Uddhav Thackeray
सांगलीत राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष

By

Published : Nov 27, 2019, 7:31 AM IST

सांगली- शहरात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेने मिरजेत फटाक्यांची आतिषबाजी तर सांगली शहरात राष्ट्रवादीकडून साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

सांगलीत राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष

हेही वाचा - जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार शरद पवारांच्या पाठीशी

मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा करण्यात आला.

हेही वाचा - थ्रीडी आर्ट पेंटिंगसह रांगोळी प्रदर्शनाच्या कलाविष्काराने इस्लामपूरकर गेले भारवून

सांगली शहरातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विजयाच्या घोषणा देत, नागरिकांना साखर वाटून जल्लोष साजरा केला. तर मिरजेत शिवसैनिकांनी आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. आता महाराष्ट्रात सेनेचा मुख्यमंत्री होणार आहे, त्यामुळे खूप आनंद झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details