सांगली: मिरज तालुक्यातल्या बेडग येथे म्हैसाळ कॅनॉलमध्ये बुडून दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये वाहून जाणाऱ्या तिसरया तरुणाला वाचण्यात यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुण सांगलीच्या माधवनगर येथील आहेत. पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरल्यानंतर घडली आहे. तर वाहून गेलेल्या तरुणांच्या मृतदेहाचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.
कालव्यात पोहण्यासाठी उतरले: मिरज तालुक्यातील बेडग येथे दोन तरुण म्हैसाळ कालव्यात वाहून गेल्याने बुडाले आहेत. तर वाहून जाणाऱ्या एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. सलमान तांबोळी (21 ), आरमान हुसेन मुलाणी (16 ) असे मृत तरुणांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. बेडगच्या म्हैसाळ मुख्य कालव्यात पोहण्यासाठी उतरले असता ही घटना घडली आहे. हे तिघेही माधवनगर येथील असून सदर तरुणापैकी सलमान टेम्पो चालक असल्याने भाडे घेऊन तो बेडग येथे आले होते. यावेळी त्याच्या सोबत आरमान मुलाणी व नदीम मुलाणी हे दोघे ही आले होते.