सांगली - शहरात मोटरसायकल चोरणाऱ्या एका चोरट्याला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. प्रथमेश ऐडके, असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शिवाय अधिक तपास पोलीस करत आहे.
शहरातील मार्केट यार्ड येथील वारणा मंगल कार्यालयाजवळ एक तरुण चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी आला आहे. अशी माहिती सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत संशयित तरुण प्रथमेश एडके (वय 21) सांगली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर सुरुवातीला त्याने उडवा -उडावीची उत्तरे दिली. मात्र, सखोल चौकशी केली असता त्या दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. एक विश्रामबाग गणपती मंदिर याठिकाणावरुन आणि कोल्हापूर रोडवरील विष्णु अण्णा फळमार्केट येथून 2 दुचाकी अशा 3 दुचाकी चोरल्याची कबुली आरोपी दिली आहे. त्यांनतर प्रथमेश याला अटक करत 3 दुचाकी व 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगलीत दुचाकी चोरास अटक - दुचाकी चोरट्याला अटक
शहरातील मार्केट यार्ड येथील वारणा मंगल कार्यालयाजवळ एक तरुण चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी आला आहे. अशी माहिती सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत संशयित तरुण प्रथमेश एडके (वय 21) सांगली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर सुरुवातीला त्याने उडवा -उडावीची उत्तरे दिली. मात्र, सखोल चौकशी केली असता त्या दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले.
सांगली पोलीस