सांगली -इस्लामपूर वाघवाडी रोडवर वाहनाच्या धडकेत एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. पूर्वा किरण खोत असे या चिमुकलीचे नाव आहे. प्रतीक पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सात वर्षीय पूर्वा गंभीर जखमी झाली आहे. याबाबत इस्लामपूर पोलिसात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कसा झाला अपघात
इस्लामपुरातील वाळवा येथील इस्लामपूर चिकुर्डे जाणाऱ्या रोडवर हा अपघात झाला. प्रतीक पेट्रोल पंपाजळील एका दुकानात आपल्या आजीसोबत रस्ता ओलंडताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने पूर्वाला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की मुलगी दहा फुटापर्यंत फरफटत गेली. त्यात तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मुलीला इस्लामपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून मुलगीचे वडील किरण खोत यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास इस्लापूर पोलीस करत आहेत.
घटना सीसीटीव्हीत कैद
ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्याची कल्पना येते. दुचाकीने या चिमुकलीला धडक दिल्यानंतर ती तब्बल दहा फुटा पर्यंत फरफटत गेली आहे. त्यानंतर तिला तीची आजी आणि अन्य लोकांनी उचलून तातडीने हॉस्पिटलमध्ये नेल्याचे दिसत आहे.