महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांची सहा लाखांने फसवणूक - with the lure of getting a job

मुंबई महानगर पालिकेत Mumbai Municipal Corporation नोकरीला लावतो with the lure of getting a job म्हणून सांगलीच्या विट्यातील दोघांना सहा लाख रुपयांना गंडा Two were cheated of six lakhs घातल्याची घटना समोर आलीआहे. या प्रकरणी रमेश भिमराव कांबळे राहणार फुलेनगर विटा, मुळ गाव मुंबई आणि कुणाल राजाराम जाधव राहणार डोंबिवली,या दोघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये Vita Police Station फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित फसल्या गेलेल्या मुलाचे वडील किरण प्रताप भिंगारदेवे यांनी फिर्याद दिली.

fraud
फसवणूक

By

Published : Aug 21, 2022, 6:48 PM IST

सांगली मुंबई महानगर पालिकेत Mumbai Municipal Corporation नोकरीला लावतो म्हणून with the lure of getting a job सांगलीच्या विट्यातील दोघांना सहा लाख रुपयांना गंडा Two were cheated of six lakhs घातला विटा येथील भाजीपाला व्यवसायिक किरण भिंगारदेवे यांचा मुलगा सचिन आणि सूरज भस्मे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून रमेश कांबळे याने २२ मार्च २०१७ रोजी ते यावर्षीच्या जून महिन्यापर्यंत आरटीजीएस रोख तसेच चलनाने कुणाल जाधव याच्या नावावर नोटरी करून प्रत्येकी तीन लाख रुपये असे एकूण ६ लाख रुपये घेतले.

शिवाय रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदावर हजर राहणेबाबतचे पत्र ही या दोघांना दिले. मात्र ही दोन्ही पत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेरीस किरण भिंगारदेवे यांनी रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेचे नोकरीची बनावट सही आणि शिक्याचे पत्रे देवून फसवणूक केल्याबाबत शनिवारी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्या नुसार फसवणुक करणाऱ्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : MLA Javalgaonkar Theft आमदार माधवराव जवळगावकर यांच्या घरातील 20 मोबाइलवर चोरांचा डल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details