सांगली- पत्नीला पळवल्याच्या रागातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी २ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सचिन होळीकट्टी आणि चंद्रकांत पुजारी, असे या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
सांगलीत पत्नीला पळवल्याच्या रागातून तरुणाची हत्या; २ संशयितांना अटक
शहरातील गोकुळनगरातील तात्यासाहेब मळा येथे एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. त्याप्रकरणी संशयिताना अटक करण्यात आली आहे.
शहरातील गोकुळनगरातील तात्यासाहेब मळा येथे एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. गणेश रजपूत (वय २५) असे त्या मृत तरुणाचे नाव होते. गणेशने सचिन होळीकट्टीच्या पत्नीला काही महिन्यापूर्वी पळवून नेले होते. याच रागातून सचिनने आपल्या साथीदाराच्या साहाय्याने गणेशला रिक्षात टाकून तात्यासाहेब मळा येथील एका निर्जन स्थळी नेले. त्याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये हात बांधून त्याला लाकडी काठीने मारहाण करून त्याची हत्या केली होती. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासात गणेशने सचिनच्या पत्नीला पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी सचिन आणि त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या.